Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

मिशन इंद्रधनुष्य मोहीम प्रभावीपणे राबवा – आ. धानोरकर

चांदा ब्लास्ट
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर तसेच तालुका आरोग्य विभाग वरोरा व नगरपरिषद वरोरा यांचे संयुक्त विद्यमाने वरोरा शहरात नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच संपूर्ण तालुक्यात ०-५ वर्ष वयोगटातील बालकास विशेष लसीकरण साठी मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे उदघाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी वरोरा माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, वरोरा उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, पंचायत समिती वरोरा  गटविकास अधिकारी संदीप गोडशेलवार, उपजिल्हा रुग्णालय वरोरा वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल खुजे, आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे, बाजार समिती माजी सभापती राजू चिकटे, सुभाष सालवटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत वीरूटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर, आरोग्य सहाय्यक सतीश येडे, डॉ. मुंजनकर यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, मोहिमेच्या जनजागृतीसाठी शाळांमार्फत प्रभातफेरी, पथनाट्य सादर करावे. लसीकरणाचे प्रमाण कमी असलेली ठिकाणे, झोपडपट्टी, बांधकाम प्रकल्प, वीटभट्टी येथेही लसीकरण मोहीम राबविली पाहिजे. त्याकरिता जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये