संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन व शोभायात्रेचे स्वागत

चांदा ब्लास्ट
संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजप्रबोधन, स्वच्छता अभियान आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचणाऱ्या गाडगेबाबांच्या कार्याची यावेळी उपस्थितांनी आठवण काढली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहिताचे कार्य अधिक जोमाने करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
शहरातून निघालेल्या शोभायात्रेचे आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर उत्साहात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते.
शोभायात्रेत सहभागी समाजबांधवांसाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर यांच्या वतीने शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



