ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हेरिटेज वॉकमध्ये विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक ठेव्यांचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

चांदा ब्लास्ट

विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक इतिहासाची जाण निर्माण व्हावी, सांस्कृतिक वारसा याबाबत अभिमान वाढावा आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे या उद्देशाने चांदा पब्लिक स्कूल मध्ये दि. 24/02/2026 ला ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता नववीचे विद्यार्थी व मंत्री मंडळातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

हेरिटेज वॉक दरम्यान विद्यार्थ्यांनी चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध बगड खिडकी, अंचलेश्वर गेट, पठाणपुरा गेट, लालपेठ येथील शिवमंदिर इ. ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. यादरम्यान इको-प्रो चे संस्थापक अध्यक्ष श्री. बंडू धोतरे यांनी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणांचा इतिहास, सांस्कृतिक परंपरा तसेच स्थानिक वारसा याबाबत महत्त्व व सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तूंचे बारकाईने निरीक्षण करत नोंदी तयार केल्या.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व हे हेरिटेज वॉक सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण शक्ती, संशोधन वृत्ती आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होते असे वक्तव्य केले.

प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी सांगितले की, अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे पुस्तकातील शिक्षण प्रत्यक्ष अनुभवाशी जोडले जाते. वारसा जपण्याची भावना निर्माण करणे आणि स्थानिक इतिहासाची जाणीव करून देणे हे या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

संपूर्ण उपक्रम शिस्तबध्द पध्दतीने पार पाडण्याकरिता कार्यक्रम प्रमुख फहीम शेख, पर्यवेक्षक महेश गौरकार, शिक्षिका वंदना बोरसरे व रेशमा शेख यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये