ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चक्क गवतावरच गिट्टी टाकत पिंपळगाव रस्ता रुंदीकरणाचे काम

जि. प. बांधकाम उप - विभागाचा अजब कारभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

पिंपळगाव वासियांच्या मोठ्या संघर्षानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने गडचांदूर–पिंपळगाव या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. रस्त्याचे कंत्राट शाह यांच्या एजन्सीला मिळाले आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असून, रुंदीकरणाचे काम करत असताना सोलिंग न करता चक्क गवतावरच गिट्टी टाकून रस्ता बनविला जात होता. तसेच रस्त्याची कुठलीही सफाई न करता हलकेसे डांबर शीतडून गिट्टी टाकली जात होती. ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच जिल्हा परिषद बांधकाम कोरपना जीवती उपविभागाच्या या अजब गजब कारभाराची माहिती उपअभियंता संतोष राठोड यांना देण्यात आली.निकृष्ट दर्जाचे बोगस काम करणाऱ्या कंत्राटदार एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी होत असून, भविष्यात हा रस्ता वर्षभर तरी टिकेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, उपअभियंता संतोष राठोड यांनी रस्ता बांधकाम ठिकाणी भेट देत निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत कंत्राटदाराला चांगलेच खडे बोल सुनावले. तसेच, केलेले काम काढून टाकून पुन्हा सोलिंग करून रुंदीकरणाचे काम करण्याचे आदेश दिले आहेत.

गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गवतावरच गिट्टी टाकून रस्ता बनवण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद बांधकाम कोरपना जीवती उपविभागाचे अभियंते या कामाची योग्य देखरेख करत नसल्याने कंत्राटदार आलोक शहा यांच्या एजन्सीला असे निकृष्ट दर्जाचे बोगस काम करण्याचे धाडस होत असल्याचे पिंपळगाव वासियांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनीही या कामाची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये