ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानोरा फाटा येथे अवैध दारू वाहतूक उघडकीस

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एक आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट. प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     भद्रावती येथून काटवल ( तु ) परिसराकडे अवैध देशी दारूची वाहतूक करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानोरा फाटा येथे सापळा रचून एका आरोपीस अटक केली. ही कारवाई रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अक्षय राऊत (वय 31 वर्षे, रा. काटवल तु) हा भद्रावती येथून देशी दारू घेऊन आपल्या गावात विक्रीसाठी नेहमीच अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती होती. त्यानुसार पथकाने मानोरा फाटा येथे त्याच्या मोपेड गाडीला अडवून झडती घेतली.

झडतीदरम्यान एका चुंगडीत 90 एमएलच्या देशी दारूच्या तब्बल 200 शिश्या आढळून आल्या. या मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे 78 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपीस ताब्यात घेऊन भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार सचिन गुरनुले, नितीन रायपुरे, संतोष येलपुलवार व जयसिंग यांनी सहभाग घेतला.

प्राथमिक तपासात आरोपी हा टप्पा परिसरातील एका देशी भट्टीतून दारूच्या पेट्या आणून काटवल, सिताराम पेठ, मोहर्ली, कोंढेगाव, विलोडा आदी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूची विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो या अवैध व्यवसायात सक्रिय असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते.

या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवायांना पुढेही चालना देण्याचा इशारा दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये