ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी पोलीस भरती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलिस शिपाई भरती २०२४-२५ संबंधाने वर्धा जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी (पुरुष व महिला पोलीस शिपाई) पोलीस भरती प्रक्रिया दिनांक ११.०२.२०२६ पासुन सुरु असुन आज दिनांक २३.०२.२०२६ रोजी वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२५ चा अखेरचा दिवस होता. आज दिनांक २३.०२.२०२६ पर्यंत पोलीस भरती प्रक्रियेतील शारिरीक मैदाणी चाचणीकरीता एकुण ७३१३ उमेदवार बोलविण्यात आले होते, त्यापैकी आजपावेतो ५५९९ उमेदवार प्रत्यक्षात हजर आले आहेत. त्यापैकी शारिरीक मैदानी चाचणीत ३५७४ उमेदवार पात्र ठरले असुन शारिरीक मैदानी चाचणीत २०२५ उमेदवार अपात्र ठरले आहेत, १७१४ उमेदवार शारिरीक मैदानी चाचणी करीता गैरहजर होते.

दररोज पोलीस भरती करिता येणाऱ्या उमेदवारांना मैदानाजवळच नाश्ता, झेरॉक्स मशीन, फोटोग्राफरची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, अॅम्बुलन्स, ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुदधा सोय करण्यात आली होती.

कोणत्याही उमेदवारास जर कोणी पैशाची मागणी करुन पोलीस भरतीमध्ये लावून देण्याचे आमिष देत असल्यास अशा आमिषाला व भुलथापांना बळी पडू नये. संपूर्ण पोलीस भरतीची प्रक्रिया ही निःपक्षपाती व पारदर्शक असुन संपूर्ण मैदान परिसरात cctv कॅमेरे आणि व्हिडिओ कॅमे-यांव्दारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून चांगल्या वातावरणात पोलीस भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २०२४-२५ यशस्वीरीत्या व निःपक्षपातीपणे पार पाडल्याबद्दल श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी वर्धा जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेमधील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांचे आभार मानले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये