सख्या भावानेच केली बहिणीची हत्या : भद्रवती शहर हादरले
आई गंभीर जखमी, प्रकृती चिंताजनक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील झिंगुजी वार्ड येथे घरगुती वादातून सख्या भावानेच मोठ्या बहिणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. तिचा जागीच मृत्यू झाला तर आई वर सुद्धा धारदार शस्त्राने गंभीर जखमे केले असून प्रकृती चिंताजनक आहे. तिला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सदर घटना भद्रावती शहरात रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान झिंगुजी वार्डात घडली. यामुळे भद्रावती शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरज शंकर भोंडे वय २८ वर्षे असे आरोपीचे नाव असून कुमारी संजीवनी शंकर भोंडे वय ३२ वर्षे असे मृतक बहिनीचे नाव आहे. तर सौ. पुष्पा शंकर भोंडे वय ५८ वर्षे असे गंभीर रित्या जखमी झालेल्या आईचे नाव आहे. तिच्यावर ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे प्रथमोपचार करून चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात नंतरच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना संपत्तीच्या वादातून झाली असल्याने गेल्या तीन ते चार दिवसापासून घरात वाद सुरु असून यात आई व बहीण हे अलग राहते तर भाऊ आणि वडील अलग राहत असल्याचे समजते.
घरी जेवतांनी भाजी करून वाद झाला असून या वादातच हा सर्व प्रकार घडल्याचे समजते. या घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे



