ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वद्य वंदे मातरम् महानाट्यात सहभागी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट

शहरातील लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महानाट्यात उत्कृष्ट सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲड . रवींद्रजी भागवत, उपाध्यक्ष श्री श्रीपादजी मुनगंटीवार , सचिव श्री राहुलजी सराफ , सहसचिव डॉ.प्रवीणजी पंत, सदस्य ॲड. अभयजी पाचपोर , श्री.अरुणजी मदनकर आणि डॉ. राम भारत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक श्री राजपुरोहित सर, पर्यवेक्षक श्री. जहागीरदार सर, पर्यवेक्षिका सौ.देगमवार मॅडम तसेच पालकवर्ग व सर्व शिक्षक उपस्थित होते.

महानाट्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील प्रभावी अभिनयामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक करत प्रमुख पाहुण्यांनी त्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष श्री भागवत साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो तसेच त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. तसेच संस्थेचे सचिव श्री सराफ साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे विशेष अभिनंदन केले. पालकांनीही विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधवी भट तसेच आभार प्रदर्शन देगमवार मॅडम यांनी केले.

कौतुक सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशाच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये