Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लिंगापुर येथील पहाडाची दरड खचायला झाली सुरवात

महसुल आणि वनविभागाने लक्ष देण्याची गरज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

ईशाळवाडीची होऊ शकते पुनरावृत्ती

मोठ्या नालीचे बांधकाम केल्यास संभाव्य धोका टळेल

आष्टी (शहीद) तालुक्यातील स्थानिक लहान आर्वी ग्रामपंचायत कक्षेतील गटग्राम लिंगापुर हे गाव वनविभागाच्या पहाडाला लागुन वसले आहे. सदर पहाड वनविभागाचा असल्यामुळे येथे सन २०१४ ते २०१९ मध्ये नाली बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने केलेला पाठपुरावा निष्फळ ठरला.पहाडापासुन लिंगापुर गावठाण सुरू होतो.या गावची लोकसंख्या २४५ इतकी असुन घरांची संख्या अंदाजे ५० एवढी आहे. लिंगापुर गाव पहाडाच्या दिशेने असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पहाडाचे पाणी गावात येते. पहाडाला लागुन प्रथम रोड आणि नंतर लिंगापुर गाव आहे.परंतु पहाडाचे पाणी निघण्यासाठी पहाड आणि रोडच्या मध्यभागात नाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यास पाणी गावात शिरतो. आणि सोबतच पहाडाची दरडीचे मोठे मोठे दगड सुध्दा कोसळतो.

यावर्षी सुध्दा नुकत्याच झालेल्या पावसाने दरडीचे मोठमोठे दगड कोसळल्याने ही बाब गावकऱ्यांनी लहान आर्वी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुनिल साबळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी लगेच घटनास्थळी जाऊन मोकापाहणी केली असता तेथे ईशाळगडची पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हाच त्यांनी गांभिर्याने दखल घेऊन तातडीने तहसिलदार सचिन कुमावत आणि वनपरिक्षेत्रधिकारी योगानंद उईके यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला.परंतु तहसिलदार सचिन कुमावत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर वनपरिक्षेत्रधिकारी योगानंद उईके यांचेशी संपर्क झाला असता सोमवारी लिंगापुर येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन वनपरिक्षेत्रधिकारी योगानंद उईके यांनी दिले आहे. याठिकाणी वन विभागामार्फत थोडाफार पहाड खचवुन पहाडाला लागुन मोठी नालीचे बांधकाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी याठिकाणी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. सदर निधी महसुल व वन विभागामार्फत मंजुर करून दिल्यास नालीचे काम होण्यास सोपे जाईल. पर्यायाने लिंगापुर गावाला पहाडाच्या दरडेपासुन होणारा धोका टळण्यास मदत होईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये