Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनपातर्फे सेल्फी स्पर्धा – मिळणार रोख बक्षीसे

माझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियान

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा व माझी माती माझा देश अभियान राबविले जात आहे. सदर अभियानाच्या जनजागृतीसाठी पंचप्रण शपथ सेल्फी तसेच तिरंग्यासोबत सेल्फी स्पर्धा राबविली जाणार असुन यात सेल्फी घेऊन मनपाद्वारे दिल्या गेलेल्या गुगल शीटवर पाठविणाऱ्या काही भाग्यवान विजेत्या नागरीकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत संपुर्ण देशात व राज्यात मेरी माटी मेरा देश ( मिट्टी को नमन विरों को वंदन ) अभियान दि.९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान राबविले जाणार आहे. नागरिकांत आपली मातीविषयी जनजागृती प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा या यामागील उद्देश आहे.
माझी माती माझा देश अभियानात नागरिकांना हातात मातीचे दिवे अथवा माती घेऊन पंचप्रण शपथ घेऊन सेल्फी काढायची आहे व हर घर तिरंगा अभियानात राष्ट्रध्वजाचा पुर्ण सन्मान राखुन स्वतः च्या घरी लावलेल्या तिरंग्यासोबतचे क्षण सेल्फीद्वारे टिपुन चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दिलेल्या https://forms.gle/cszPxPNnkM6CDVJa6 या गुगललिंक वर पाठवायचे आहेत अथवा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करावयाचा आहे.तसेच सेल्फी आपल्या सोशल मिडियावर सुद्धा अपलोड करावयाची आहे.
अपलोड करतांना #cmc #हर घर तिरंगा #merimatimeradesh #चंद्रपूर हे सर्व हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. सेल्फीमध्ये घर व तिरंगा तसेच मातीचे दिवे अथवा माती हातात घेतली असल्याचे स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. सेल्फी विथ तिरंगा स्पर्धेसाठी सेल्फी पाठविण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट असुन पंचप्रण शपथ सेल्फी स्पर्धेची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. स्पर्धेनंतर ईश्वरचिट्ठीद्वारे निकाल घोषित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेच्या CMCchandrapur या फेसबुक पेजला भेट द्यावी तसेच स्पर्धेत मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी,तरुण व सर्व वयोगटातील नागरिकांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये