ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अर्थखाते व एसटीमहामंडळ सवलतपुर्तीच्या रकमेबाबत बसुन तोडगा काढावा

कर्मचाऱ्यांना वेटीस धरू नये _ विजय नानकर - सचिव सेवाशक्ती संघर्ष युनियन 

चांदा ब्लास्ट

एसटी कर्मचाऱ्यांना 7 तारखेला होणारे वेतन म्हणजे त्यांची मौजमजा नसुन त्यांची मागच्या महिन्यातील रखडलेली उधारी, घरभाडे, वीजबील, दुध,शालेय फि, रिक्षाफी,ट्युशन फी, किराणा ई आणि महत्वांचे ज्यांची लहान मुले आहेत त्या मुलांना त्याच्या बापाने दिलेला शब्द पुढच्या पगारात पाहु हे दाखवले स्वप्न आणि त्याच स्वप्नाचा आधार घेऊन निरागसपन 7 तारखेला पप्पांसमोर येणारा प्रश्न पप्पा आज 7 तारीख आहे पगार झाला ना माझा खाऊ माझी ट्युशन फि रिक्षा फी द्याल का? आणि त्याच प्रश्नावर त्याचा बापाचा पडलेला चेहरा आणि उदगीन्व परिस्थीतीतुन एखाद्या बापाची झालेली आत्महत्या हे सर्व 7 तारखेच्या पगारावर अवलंबून असते.

          दरमहा 7 तारीख आली की अर्थखात्याच्या काहीतरी नवीन कुरापत निघते व महामंडळाला देण्यात येणाऱ्या सवलतपुर्ती मुल्य रकमेचा खोडा घातला जातो परिणामी वेतन उशिरा होते मग या बातम्या दरमहा प्रिंटमिडीयावर झळकतात त्यातुन जनमाणसात एसटी कर्मचाऱ्यांना बघण्याचा कल बदलतो व पगार झाला का मोठ्या मोठ्या बातम्या देऊ एसटी कर्मचाऱ्यांचे दरमहा हसु करत आहे.. अर्थखात्याला कदाचीत विसर पडला आहे की एसटी महामंडळाला दरमहा सरकारी तिजोरीतुन दिली जाणारी रक्कम ही महामंडळाला उपदान म्हणून नव्हे तर सरकारने जनतेसाठी दिलेल्या सवलतमुल्याची रक्कम आपन देत आहोत त्यामुळे अर्थखात्याला रक्कम देतांना आढेवेढे घेण्याची आवश्यकताच नाही.

       मूळात एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन ईतके नाही कि वेतन रखडल्याने त्याचे घरदार सुरळीत चालु शकेल आहे त्याच वेतनात त्यांना महिना भागवावा लागतो याची जाणीव अर्थखात्याने ठेवावी व दरमहा एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लागणारा निधी 5 तारखेपर्यत उपलब्ध करून द्यावा तसेच सदर सवलतपुर्ती रकमेबाबत अर्थखाते व महामंडळ यांचेतील जे काही मतभेद आहेत ते शासनस्तरावर बैठक लावुन मिटवून घ्यावा पन 7 तारखेनंतर वेतनाला खोडा घालु नये..

*योग्य त्या कार्यवाहीस्तव*

१) मा. श्री.देवेंद्रजी फडणवीससाहेब

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

२) मा.श्री.प्रतापजी सरनाईकसाहेब

परिवहनमंत्री तथा अध्यक्ष एसटी महामंडळ

३) मा.श्री माधवजी कुसेकरसाहेब

उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एसटी महामंडळ

४) मा.श्री.गोपीचंद पडळकरसाहेब

आमदार तथा अध्यक्ष सेवाशक्तीसंघर्ष युनियन

५) मा.मंगेशजी चव्हाणसाहेब

आमदार चाळीसगाव विधानसभा

६) मा.श्री सतिषजी मेटकरी

सरचिटणीस सेवाशक्ती संघर्ष युनियन

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये