ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुणवंतांचा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी – डॉ. प्रवीण येरमे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय, गडचांदूर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. शैक्षणिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रवीण येरमे यांनी गुणवंतांचा सन्मान हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळविता येते, असे सांगितले.

प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास व कौशल्यविकास कार्यक्रमांची माहिती दिली. अध्यक्ष नामदेवराव ठेंगणे यांनी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात बी.ए.सी.एस. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बालाजी भाऊ पूरी, प्रवीण लोहे, प्रतीक मून यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. छाया गायकवाड यांनी, तर आभार प्रदर्शन खुशी करमणकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये