आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती
_संतनगरी धाबा येथील कोंडय्या महाराज देवस्थानात कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दिनांक ३० जुलै) रोजी, संतनगरी धाबा येथील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानात महाआरती, रुद्राभिषेक आणि विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी ईश्वराचरणी प्रार्थना केली.
श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांच्या प्रमुख उपस्थितीत देवस्थानात विधिवत महाआरती करण्यात आली. सोबतच आमदार मुनगंटीवार यांच्या दीर्घायुष्यासाठी रुद्राभिषेक आणि शेगमवार महाराज यांनी मंत्रोच्चारात धार्मिक अनुष्ठान पूर्ण केले.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दीर्घायुष्यासाठी संपन्न झालेल्या या धार्मिक कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी बोडलावार, धाबाच्या प्रशासकीय समिती अध्यक्षा नंदा घोगरे, बाजार समिती सभापती इंद्रपाल धुडसे, उपसभापती स्वप्नील अनमुलवार, रोशनी अनमुलवार, कांचन गरपल्लीवार, अरुण कोडापे, हिराचंद कंदीकुरवार, संजय येलमुले, अनिसा शेख, संतोष गरपल्लीवार, निखिल चंदनगिरीवार, आशिष मामीडपेल्लीवार, हरीश घोगरे, विठ्ठल चनकापुरे, अनिकेत नामेवार, सूरज मोहुर्ले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



