ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आरवट येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व मिठाईचे वाटप
मान.आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तर्फे जिल्हा परिषद शाळा आरवट येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व मिठाईचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आरवट येथील सरपंच सुलभा भोंगळे, मुख्याध्यापक अमित कुमार दुर्गे, अंगणवाडी सेविका नीतूनिशा गोरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी प्रकाश चुणारकर व विवेक आंबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.



