ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्यात बैल ठार

टेकाडी दिक्षीत येथील घटना ; शेतकऱ्याचे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :- शेतात चरत असलेल्या दोन बैलांपैकी एका बैलावर वाघाने हल्ला करुन त्याला ठार मारल्याची घटना तालुक्यातील टेकाडी दिक्षीत येथे दिनांक २९ रोज बुधवारला दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.यात शेतकऱ्याचे एक लक्ष विस हजिर रुपयांचे नुकसान झाले असुन ऐन हंगामात एक बैल मृत्युमुखी पडल्यामुळे पुढील शेतीहंगाम कसा करावा हा प्रश्न सदर शेतकऱ्यापुढे पडला आहे.या घटनेची तक्रार भद्रावती वनविभागाला करण्यात आली असुन याची त्वरीत नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी पिडीत शेतकऱ्याने केली आहे.

टेकाडी दिक्षीत येथील शेतकरी पंढरी शिवराम गायकवाड यांचे बैल शेतात चरत होते.दबा धरुन बसलेल्या वाघाने एका बैलावर हल्ला करुन त्याला ठार केले.यावेळी गायकवाड यांनी आरडाओरड केली मात्र वाघ त्यांचेवर गुरगुरला त्यानंतर त्यांनी मदतीला इतर गावखऱ्यांना बोलावले व आरडाओरड केल्यानंतर वाघ पळून गेला. घटनेची तक्रार वनविभागाला करण्यात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.मृत बैलाची किंमत एख लक्ष विस हजार सांगण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये