लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपना ग्रामीण रुग्णालयात फळवाटप व वृक्षारोपण
सेवाभाव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भाजप कार्यकर्त्यांचा सामाजिक उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरटकर
कोरपना :- विकास पुरुष, लोकनेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी कोरपना शहराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप आणि रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून हा वाढदिवस अत्यंत उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमा दरम्यान रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करून त्यांना ताजी फळे वाटप करण्यात आली व त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रुग्णालय परिसरात विविध झाडांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
या स्तुत्य उपक्रमाला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून भाजप तालुका व शहर नेतृत्व: संजय मुसळे (तालुकाध्यक्ष), अमोल आसेकर (शहराध्यक्ष), विजय पानघाटे (महामंत्री), सुनील देरकर (महामंत्री). महिला मोर्चा व लोकप्रतिनिधी: सौ. स्मिताताई चिताळे (महिला मोर्चा तालुकाध्यक्ष), नगरसेविका वर्षा लांडगे, नगरसेविका वैरागडेताई, अल्काताई रणदिवे, इंदिराताई कोल्हे, पवन बुरेवार (युवा मोर्चा शहराध्यक्ष), मोहब्बत खान (अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष). सचिन डाखरे, प्रतीक बिडवाईक, राहुल बिडवाईक, कृणाल ठावरी, सत्यवान घोटेकर, संतोष बोरडे, विशाल पावडे, विठ्ठल तुमराम, पुंडलिक उलमाले, हरबाजी झाडे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या दीर्घायुष्याची व उत्तम आरोग्याची प्रार्थना करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “भाऊंच्या नेतृत्वाखाली समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि लोककल्याणाचे कार्य निरंतर सुरू राहो,” अशी सदिच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी या सेवाभावी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.



