शिष्यवृत्ती परीक्षेत विश्वशांती विद्यालयाचे सुयश
उज्वल यशाची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ७ वी (सत्र २०२६ -२७) मध्ये भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित विश्वशांती विद्यालयाने यश प्राप्त केले आहे.या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यालयाचे दोन विद्यार्थी पात्र झाले असून त्यात कुमारी गार्गी सचिन जक्कुलवार आणि कुमारी किंजल राजेंद्र प्रधाने यांचा समावेश आहे.विद्यालयामध्ये अगदी सत्राच्या सुरुवातीपासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियमित तासिका आणि मार्गदर्शन करण्याचे काम विद्यालयातील वर्ग शिक्षक राजेश मांदाडे,विषय शिक्षक किशोर संगीडवार,अरुण सातपुते, रवींद्र कन्नाके, गिरीश चलाक,सहाय्यक शिक्षिका काजल बारापात्रे यांनी केले.
विद्यालयातील या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार,सचिव राजाबाळ पाटील संगीडवार,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक राजेश झोडे, तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद,पालक यांनी यशस्वी विद्यार्थांचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



