वर्धा जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत मोठी कारवाई
एकूण 22 लाख 75 जारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस अधीक्षक वर्धा श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वर्धा जिल्ह्यात दिनांक 27/07/2026 रोजी सायंकाळी 17.00 वा. ते 22.00 वाजे पर्यन्त ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती.
या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व 19 पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने सहभाग नोंदवला. मोहिमेदरम्यान अवैध दारू विक्री, अमली पदार्थ (NDPS), शरीरविरुद्धचे गुन्हे, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईत 55 सराईत आरोपीतांवर दाखल करण्यात आले असून एकूण 22,75,687 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा संक्षिप्त तपशीलः
अवैध दारू विक्रीः जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणा-या 249 ईसमांना चेक केले असता 166 ईसम हे हजर मिळुन आले त्यापैकी 52 ईसम दारुविक्री करतांना मिळुन आल्याने त्यांचेवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअन्वये कारवाई करुन एकूण 22,22,282 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
NDPS (अमली पदार्थ): रेकॉर्डवरील 55 आरोपीतांना चेक केले असता 42 गुन्हेगार आपआपले घरी हजर मिळुन आले. त्यांची कायदेशीर रित्या घरझडती घेण्यात आली.
पाहिजे/फरार आरोपीः 7 पाहिजे आरोपी आणि 8 फरार आरोपींचा शोध घेण्यात आंला.
जुगारः रेकॉर्डवरील 71 आरोपीतांना चेक केले असता 40 गुन्हेगार हजर मिळुन आले व 02 गुन्हेगाराविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करून 53,205 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आर्म्स अॅक्टः रेकॉर्डवरील 40 आरोपीतांना चेक केले असता 30 गुन्हेगार घरी हजर मिळुन आले. एका घरझडतीदरम्यान एक शस्त्र मिळुन आल्याने गुन्हेगाराविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
इतर कारवायाः कलम ५५,56 म. पो. का अन्वये हद्दपार करण्यात आलेले 18 गुन्हेगार चेक केले असता हद्दपार असलेल्या 18 आरोपीतांपैकी कोणताही हद्दपार ईसम हजर मिळुन आला नाही. तसेच MPDA मधुन सुटलेले गुन्हेगार चेक करण्यात आले असुन त्यांचे गालचालीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
तसेच जिल्हा वाहतुक शाखेकडुन महत्वाचे ठिकाणी नाकाबंदी करुन मोटर वाहन कायद्याअन्वये ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच ईतर कारवाई करण्यात आली. सदर ऑपरेशन ऑल आऊट मोहिममध्ये एकूण 36 अधिकारी आणि 282 अंमलदारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. भविष्यातही जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अश्या प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविल्या जातील, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अवैध कृत्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी केले आहे. सदर ऑपरेशन ऑल आऊट मोहिम श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांचे मार्गदर्शनात राबविण्यात आली.



