ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यात व वर्धा शहरात सार्वजनिक रोडवर आपल्या मालकीचे पाळीव गुरेढोरे मोकाट सोडणाऱ्या मालकांना वर्धा जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी पाळीव जाणवरा वर आवर घालण्याचे दिले आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 बेजबाबदारपणे निष्काळजीपणे सोडून देणारे गुरेढोरांचे मालक यांच्यावर मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे आदेशाने पोलीस प्रशासन करणार कायदेशीर गुन्हे दाखल व ढोरे जप्त करुन कोंडवाड्यात टाकणार, गुरेढोरे मालकांना पोलीसांचा ईशारा

वर्धा शहरामध्ये कोणत्याही सार्वजनिक रोडवर काही गुरेढोरे मालक हे विनाकारण बेजबाबदारपणे निष्काळजीपणे आपली पाळीव जनावरे रोडवर मोकाटपणे सोडून देत असतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीची कोंडी होत असते. व वाहन चालक यांचा अपघात होवून त्यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा प्राणही जावू शकतो. अशा मोकाट गुरेढोरांमुळे कोणाचाही रस्त्यावर अपघात होवू नये व प्राणहानी होवू नये याकरीता पोलीस प्रशासन हे मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांचे आदेशाने आता गुरेढोरे मालकांवर कठोर कारवाई करणार आहे. ज्यामध्ये रस्त्यावरील मोकाट गुरेढोरे हो जप्त करुन कोंडवाड्यात टाकणार आहेत व मालकांविरुध्द कायदेशीर गुन्हे दाखल करणार आहेत.

1) कलम 291 BNS पशु जनावरे संबंधी निष्काळजीपणा, हलगजीपणा करणे व नुकसानीस कारणीभूत ठरणे. 6 महीने कारावास किया 5000 / रु दंड

2) कलम 285 BNS सार्वजनिक रस्ता अडविल्याबद्दल शिक्षा 5000 रु पर्वत दंड

3) कलम 125 BNS ईतरांचे जिवाला धोका निर्माण करने शिक्षा सहा महीने कारावास किंवा 10,000 / रु दंड

4) मोटार वाहन कायदा कलम 182 अन्वये सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे शिक्षा 500 ते 1500 / रु दंड

5) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 132 यामध्ये नगरपरीषद किंवा ग्रामपंचायत प्रशासन रोडवरील मोकाट जनावरे जप्त करुन कोंडवाड्यात जमा करु शकतात व मालकाकडून जनावरांचे देखभालीकरीता लागणारा खर्च व दंड वसूल करु शकतात.

या वरील कलमाप्रमाणे गुरेढोरे मालकांविरुध्द आता नगर परीषद प्रशासन व पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करणार आहेत. तरी सर्व गुरेढोरे रस्त्यावर मोकाट सोडणारे मालकांना याव्दारे कायदेशीर सुचना देण्यात येत आहे की, त्यांनी आपली गुरेढोरे रस्त्यावर मोकाट सोडू नये अन्यथा अपघात झाल्यास गुरेढोरे मालकांना सुध्दा दोषी धरण्यात यावे (विलास पाटील) पोलीस निरीक्षक

जि.वा. नियंत्रण शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये