वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग _ सहा. फौ. रियाज खान वाहतूक शाखा
सुशील हिम्मतसिंग विद्यालय येथील परिवहन समिती एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २७/७/२६ रोजी सुशील हिम्मतसिंग विद्यालय महिला आश्रम वर्धा येथे कार्यशाळा घेण्यात आली
रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारी जीवित हानी रोखण्यासाठी वाहतूक सुरक्षा ही काळाची गरज आहे वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन वाहनांची नियमित तपासणी आणि वाहन चालवताना घ्यावयाची खबरदारी यामुळे दरवर्षी हजारो निष्पाप जीव वाचू शकतात सुरक्षित प्रवास हाच आपल्या व इतरांच्या आनंदाचा खरा मार्ग आहे सर्व प्रत्येक वाहन चालकांने मनात ठेवला पाहिजे
वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग आहे असे प्रतिपादन सहाय्यक फौजदार रियाज खान वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांनी या कार्यशाळां मध्ये ऑटो व्हॅन व स्कूल बस चालक मालकांना माहिती देऊन अवगत करण्यात आले तसेच अमली पदार्थ सेवनाने माणसाला नशा सुस्ती किंवा मानसिक धुंदी येते व मानसिक आणि शारीरिक आजार होतात व्यक्तीचे आयुष्यात उध्वस्त होऊ शकते खरा गुटका तंबाखू गांजा ड्रग्स याचा वापर करू नये या विषयावर सांगण्यात आले
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शन खाली तसेच पोलीस निरीक्षक विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा यांचे आदेशाने परिवहन समितीची कार्यशाळा सुशील हिम्मत सिंग विद्यालय महिला आश्रम वर्धा येथे घेण्यात आली कार्यक्रमचे अध्यक्ष मुख्याध्यापक शेषरावजी पाटील सचिव मंगेश कोपुलवार होते शाळेतील ऑटो व्हेन स्कूल बस चे चालक-मालक यांचे उपस्थिती होत्या
शिक्षक प्रदीप साखरकर यांनी सर्व उपस्थित असलेले यांचा आभार प्रदर्शन केले



