ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकातर्फे गणेशपुर पारधी बेडा येथे धडक वॉशआऊट मोहिम.”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा पोलीस अधीक्षक मा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील गावठी दारू निर्मीती करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने गावठी दारू निर्मीती करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची धडक मोहिम राबविली असुन, सदर मोहिमेदरम्यान दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस स्टेशन समुद्रपुर हद्दीतील मौजा गणेशपुर पारधी बेडा येथे वॉशआऊट मोहिमेदरम्यान गावठी दारू निर्मीती करणाच्या ठिकाणांचा शोध घेवुन मोठ्या प्रमाणात मोहा सडवा रसायण मुद्देमाल नाश करण्यात आला. सदर मोहिमेत अंदाजे 9,200 ली. मोहा सडवा रसायण, 450 ली. गावठी मोहा दारू इतर भट्टी साहित्यसह जु.कि. 20,33,700 रू चा मुद्देमाल जप्त करून, जागीच नाश करण्यात आला असुन, गावठी मोहा दारूची निर्मीती करणारे गुन्हेगार नामे 1) गणराज हंसिराज पवार, 2) अश्विनी राऊत, 3) वैशाली प्राण पवार, 4) चंदा सुभाष पवार, 5) बिजली सौक्षा राऊत, 6) शेषपाल माणिक पवार सर्व रा. गणेशपुर पारधी बेडा यांचेविरूध्द पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे दारूबंदी कायद्यान्वये एकुण 06 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

 सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.अं. शेखर डोंगरे, नरेंद्र पाराशर, अरविंद येनुरकर, रामेश्वर नागरे, रवि पुरोहित, सागर भोसले, सुगम चौधरी, शुभम राऊत, विकास मुंडे, मिथुन जिचकार, प्रफुल राजेंद्र पुनवटकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये