ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘सहकार सप्ताह २०२६’ चा दिमाखदार शुभारंभ

बँकेच्या परिसरात उभारला जाणार बाबासाहेब वासाडेचा भव्य पूर्णाकृती पुतळा

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘सहकार सप्ताह २०२६’ चा दिमाखदार शुभारंभ

माजी जि.प. अध्यक्षा श्रीमती वैशालीताई वासाडे यांचा जाहीर नागरी सत्कार

बँकेच्या परिसरात उभारला जाणार बाबासाहेब वासाडेचा भव्य पूर्णाकृती पुतळा

चंद्रपूर : सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे सहकार महर्षी कै. अॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाच्या ‘सहकार सप्ताह २०२६’ चा (१९ ते २५ सप्टेंबर) चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयातील मा.सा. कन्नमवार सभागृहात अत्यंत उत्साहात व दिमाखात प्रारंभ झाला. या सोहळयात सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती वैशालीताई वासाडे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला, तसेच कै. अॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या सोबत काम केलेल्या सहकारनिष्ठ सहकाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार तथा बँकेच्या संचालिका प्रतिभाताई धानोरकर होत्या, तर उ‌द्घाटन चिमूरचे आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या हस्ते झाले.

या सोहळयास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार सुधाकर अडवाले, बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, संजय वासाडे, बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे, मानद सचिव अवेश खान पठाण उपस्थित होते.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी स्व. बाबासाहेव वासाडे यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली. स्व. बाबासाहेब वासाडे यांच्यामुळे सहकाराची खरी ताकद, खाचाखोचा आणि मुल्ये शिकता आली. त्यांच्यामुळेच आज भी सहकार क्षेत्रात सक्षमपणे उभा राहन जनतेची सेवा करु शकत आहे. अशी कृतज्ञता रविंद्र शिंदे यांनी व्यक्त केली. भावी पिढीला प्रेरणा मिळावी माणून बँकेच्या आवारात बाबासाहेबांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे मानस आहे व दरवर्षी १९ सप्टेंबर पुण्यतिथी निमित्त ‘सहकार सप्ताह’ म्हणून साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय बँकेने घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यास उपस्थितांनी सहमती दर्शविली.

सदर प्रसंगी आमदार सुधाकर अडबाले यांनी बाबासाहेब हे निव्वळ सहकार क्षेत्रातील नेते नाही, तर सहकारासोबत शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली. याबाबत बँकेनी घेतलेला सहकार सप्ताहाचा कार्यक्रम कौतुकास्पद असुन भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले.

उद्‌द्घाटन प्रसंगी आपले मत व्यक्त करतांना आमदार बंटीभाऊ उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांनी बाबासाहेबांनी घडविलेल्या कार्यकर्त्याचा भेटीचा प्रसंग सांगुन बाबासाहेवांच्या तालमित पडलेला कार्यकर्ता हा विचाराशी तडजोड न करता एकनिष्ठेनी वावरनारा आहे, असे मत व्यक्त करुन बँकेला सहकार क्षेत्रात मानाचे स्थान मिळवुन देण्याचे काम बाबासाहेब वासाडे यांनी केले व बचतगटाची चळवळ उभारुन चंद्रपूर जिल्हाबँकेचा नाव लौकीक राज्य पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर नेऊन जिल्हयाचा मान उंचावलेला आहे. आजच्या घडीला ६,००० कोटी पर्यंत उलाढाल करणारी जिल्हा बँक विदर्भात प्रथम स्थानी आहे. ही आपल्या जिल्हयाची गौरवशाली बाब आहे. यात बाबासाहेबांचा व बाबासाहेबांसोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. बाबासाहेब वासाडे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम बँकेनी त्वरीत हाती घ्यावे, असे सुचविले.

तसेच मा. हंसराज अहिर यांनी आपले मत व्यक्त करतांना बाबासाहेबांचे संबंध जिल्हयातील तसेच राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांशी होते, त्यात प्रामुख्याने राज्यातील मातब्बर नेते मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब व इतर सहकार चळवळीतील नेत्यांचा संबंधाचा वापर बाबासाहेबांनी आपल्या बुध्दी कौशल्याने वापरुन जिल्हयात सहकाराचे जाळे पसरविले. सोबतच जिल्हयाचे नाव लौकीक वाढविले. बाबासाहेब हे सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांस प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार शहरी व ग्रामीण भागात खोलवर रुजलेले आहेत. बँकेने बाबासाहेब वासाडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या सहकार सप्ताह कार्यक्रम सहकारी संस्था साठी व सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकरीता प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले.

सहकार सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन लाभलेल्या श्रीमती प्रतिभाताई सुरेश धानोरकर, खासदार तथा संचालिका यांनी आपले मत व्यक्त करतांना कै. बाबासाहेब वासाडे हे पळसगांव येनबोडी गावापासून सुरुवात करुन ग्रामीण भागातील शेतकरी व शेतकरी बांधवांसाठी शैक्षणिक संख्या ग्रामीण भागातच उभारल्या व ग्रामीण जनतेशी एकनिष्ठ राहुन सहकाराचे जाळे विणले व त्याचाच परिणाम म्हणुन त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात सलग सहा वेळा नावार्ड पुरस्कृत बचतगतात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेला पारितोषीक मिळाले. आज घडीला सुध्दा बँकेचे अध्यक्ष व माझे सहकारी संचालक मंडळ सुध्दा ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटीबध्द असुन मी अभिमानाने सांगतो की, जिल्हा बँकेला दिलेले पिककर्ज वाटपाचे लक्षांक रु.८३५ कोटी पुर्ण करुन रु.८४८ कोटीचे पिककर्ज वाटप केले. तसेच महिला बचतगटांना ७,०७४ महिला बचतगटांना रु.१८७ कोटी कर्ज वाटप करुन जिल्हयातच नाही तर राज्यात बचतगट कर्ज वाटपात उच्चांक गाठला. बचतगटांना कर्जवाटप करणे बाबतचे सर्वप्रथम कार्य कै. बाबासाहेब वासाडे यांच्या कार्यकाळात सुरु झाले व ते अविरत सुरु आहे. बाबासाहेबांनी सुरु केलेले कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम बँक करीत आहे. हिच खरी बाबासाहेबांना मानवंदना आहे आणि बँकेनी बाबासाहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हा बँकेच्या वतीने संपुर्ण जिल्हा बँकेच्या शाखा व सहकारी संस्था येथे सहकार सप्ताहाचे आयोजन करुन सहकार चळवळ मजबुत करण्याचे काम करीत आहे. त्यासाठी सहकारी निष्ठ सहकार्यांनी सहकार चळवळीतुन ग्रामीण, गरजू आणि होतकरु समाजाचा व बचतगटांतील महिलांचा विकास साधावा, असे मत व्यक्त केले.

तसेच आमदार देवराव भोंगळे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमास संदेश दिला बाबासाहेबांच्या विचारांवर चालत ग्रामिण भागाला समृध्द आणि स्वावलंबी करण्यासाठी बँक कटिबध्द असल्याचा निर्धार व्यक्त करत बँकेतर्फे सर्व शेतकरी, महिला आणि सहकारप्रेमींचे आभार मानण्यात आले.

यावेळी बँकेचे संचालक सुदर्शन निमकर, गणेश तर्वेकर, रोहित बोम्मावार, गजानन पाचोडे, जयंत टेंभुर्डे, निशिकांत बोरकर, दिनेश चोखारे, उल्हास करपे, यशवंत दिघोरे, डॉ. ललित मोटघरे, दामोदर मिसार, डॉ. अनिल वाढई, सौ. नंदाताई अल्लुरवार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेन्बर कल्याणकर यांच्यासह बाबासाहेबांना माननारा वर्ग शेतकरी, बचतगटातील महिला, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये