गावात न येताच बसेसचा ‘बायपास’, दोनशेवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
केळझर येथे बस नेण्यास चालक, वाहकांची चालढकल ; प्रतिक्षेनंतर गावात बस न आल्याने विद्यार्थ्यांना जावे लागते घरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
शाळा – कॉलेज सुरु होताच चालक – वाहकाची अरेरावी सुरु
वर्धा ते नागपूर मार्गावरील केळझर येथे बसगाड्यांचा थांबा देण्यात आला आहे. येथून शेकडो विद्यार्थी दररोज शाळा, महाविद्यालयात सेलू, वर्धेला आवागमन करतात. पण, बहुतांश बसगाड्या नागपूर – वर्धा राष्ट्रीय महामार्गानेच बायपासने भरधाव पळतात. गावात बसेसच येत नसल्याने विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळावे लागते. दररोज गावात दोन – दोन तास बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय ,ट्युशन क्लासेसला न जाता घरी परत जावे लागते.. त्यामुळे केळझरसह परिसरातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
तालुक्यातील केळझर गाव वर्धा ते नागपूर मार्गावरील महत्त्वाचे गाव आहे. परिसरातील अनेक गावे केळझरला जोडली आहेत. महत्त्वाचा थांबा असलेल्या केळझर येथे जलद बसफेऱ्यांना थांबा देण्यात आला आहे. नागपूर – तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर गावापासून काही अंतरावर बायपास गेला आहे. बसफेऱ्यांना थांबा असल्याने बसफेऱ्या गावात येणे आवश्यक आहे. पण, बहुतांश बसफेऱ्या बायपासनेच जातात. अनेक वाहक तर चक्क केळझरचा थांबा नसल्याचेही सांगत प्रवाशांना घेण्यास नकार देत असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. गावात न येता सरळ बायपासमार्गेच बसगाड्या जात असल्याने विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार सर्वसामान्य प्रवाशी असे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. बसगाड्या गावात आणण्यास टाळाटाळ केली जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत बसेस गावात न नेणाऱ्या चालक, वाहकांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
*बॉक्स* प्रतिक्षेनंतरही बस न आल्याने विद्यार्थ्यांना जावे लागते घरी*
केळझर येथून वडगाव- (जंगली ) , आमगाव – (खडकि), जुनगड, गायमुख, दहेगाव गोसावी , खडकी,नवरगाव (पु.) सेलडोह आदी ठिकाणचे दोनशे ते अडीचशे विद्यार्थी शिक्षणाकरिता आवागमन करतात. त्यामुळे प्रतिक्षा करूनही बस न आल्याने विद्यार्थ्यांना घरी परत जावे लागते.
*अधिकारी कारवाई कधी करणार?*
चालक, वाहकांच्या या प्रकाराबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात आलीत. अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. पण, कारवाई मात्र होत नसून केळझर येथे बस थांबविण्यास टाळाटाळ कायम असल्याचे दिसते..
*ऑटोचालकांना द्यावे लागते जास्तीचे रुपये*
दोन तास प्रतिक्षा करूनही बस न आल्याने विद्यार्थ्यांना घरी परत जायची वेळ येते तेव्हा जास्तीचे रुपये देवुन गरजु विद्यार्थ्राना आटोने जावे लागते..परत येते वेळि रात्री बायपास वरच उतरुन देतात.रात्री बायपास वर कुणी राहत नसुन सुमसाम जागेवरुन गावात एककिलोमीटर जागा पायदळ यावे लागते.



