ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस ठाणे वर्धा (शहर) चे डी.बी. पथकाची कामगिरी मोटर सायकल चोरीचा केला गुन्हा उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गुन्हयाची थोडक्यात हकिगत या प्रमाणे आहे की, यातील तकारदार शादाब मन्सुरी इकबाल मन्सुरी, वय 23 वर्षे रा. सेलु जि. वर्धा हे त्यांचे मोटर सायकल हीरो कंपनीची स्पेंन्डर एक्सटीईसी काळया रंगाची क्रमांक एम. एच 32 एव्ही 0427 कि.75,000/ रूपये ने दि. 10/09/2026 चे 14/00 वा. ते 16.00 वा. दरम्यान डागा हॉस्पीटल वर्धा येथे कामानिमित्त गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पो.स्टे. वर्धा (शहर) येथे अप.क. 1510/2026 कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

पोस्टेला गुन्हा नोंद होताच गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन अज्ञात आरोपी मिळुन यावे म्हणुन पोनि नागेशकुमार चतरकर यांनी विशेष पथक नियुक्त करून विशेष पथकाने आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज तपासुन तसेच मुखबिर कडुन मिळालेल्या खात्रीशिर खबरे वरून सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी महेश अंबादास वांढरे वय 42 वर्ष रा. वालदुर त. हिंगणघाट जि. वर्धा ह.मु. काटवे यांचे घरी किरायाने गोंड प्लॉट, केजाजी चौक वर्धा हा निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेवुन त्याला सदर गुन्हयात अटक करून त्याचा मा. न्यायालयातुन पीसीआर घेवुन आरोपीने चोरी केलेली फिर्यादी यांचे मालकीची मोटर सायकल हीरो कंपनीची स्पेंन्डर एक्सटीईसी काळ्या रंगाची कमांक एम. एच 32 एव्ही 0427 कि. 75,000/ रूपये ही जप्त करण्यात आली.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा. सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुनिल महाडिक सा. वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार मा. पो.नी. नागेशकुमार चतरकर पो.स्टे. वर्धा शहर, तसेच निर्देर्शाप्रमाणे, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि शरद गायकवाड, गुन्हे शोध पथकाचे पोहवा /1378 प्रशांत वंजारी, पोहवा /1444 नरेंद्र कांबळे, पोहवा/523 महेंद्र पाटील, पोलीस अंमलदार/1599 वैभव जाधव, श्रावण पवार / 1342, सर्व पोलीस ठाणे वर्धा शहर यांनी केली. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहवा /1378 प्रशांत वंजारी पोलीस ठाणे वर्धा शहर हे करीत असुन अधिक गुन्हे उघककीस येण्याची शक्यता आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये