ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महापांढरवाणीत ग्रामस्वच्छता व वृक्षारोपणातून ग्रामविकासाला चालना

ग्रामविकासासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग ; १५ सप्टेंबरला आधार अपडेटेशन व पोस्ट खाते उघडण्याचे शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- महापांढरवाणी येथे ग्रामस्थांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमाच्या श्रमदानाचा बारावा आठवडा उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यासोबतच श्रमदानातून वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

मागील आठवड्यात लावण्यात आलेल्या वृक्षांना संरक्षणासाठी कंपाऊंड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे जंगल परिसरात जाणे शक्य नसल्याने नियोजित उपक्रमात बदल करून गावातच ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीतही श्रमदानाचा उपक्रम खंडित न करता ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपली.

दरम्यान, यावेळी ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ग्रामस्थांच्या विविध मागण्यांवर चर्चा करत १५ सप्टेंबर २०२६ रोजी आधार अपडेटेशन तसेच पोस्ट खाते उघडण्याचे शिबिर आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेत तहसीलदार, जिवती तसेच गटविकास अधिकारी, जिवती यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांना गावातच आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या श्रमदान उपक्रमात गावपाटील मानकू पाटील धुर्वे, सरपंच जंगू पाटील कोटनाके, लिंगोराव सोयाम, अनिल आडे, तुकाराम धुर्वे, अनिता धुर्वे, मोहन आत्राम, भोजू सिडाम, सिताराम आडे, बादू आडे, इसरू आडे यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये