ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“मीयावाकी” रोपवन फुलविण्यासाठी वनविभागाकडून झाडांची कत्तल

राष्ट्रीय महामार्गालगत गोंडपिपरीत वनविभागाचे दुटप्पी धोरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

तेलंगणा सीमेवरील असलेला गोंडपिपरी तालुका वनसंपदेणे नटलेला आहे. मध्यचांदा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन व वन्यजीवांचा समावेश आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी येतील वनविभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. असे असताना मात्र “मियावाकी रोपवन” घटनेने वनविभागाची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली आहे.

गोंडपिपरी शहरालगत राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या काष्ट आगारानजिक जागेत मीयावाकी रोगवन फुलवीण्याचे वन विभागाचा नियोजन आहे. महिनाभरापासून हे काम सुरू आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या झाडांच्या मुळावर घाव करत झाडांची कत्तल करून वनविभागाने हा डाव साधला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

चंद्रपूर – अहेरी मुख्य मार्गावर गोंडपिपरी शहरालगत काष्ट आगार आहे. निसर्गरम्य असलेल्या याच परिसरात मीयावाकी रोपवन फुलविण्याचे वनविभागाचे नियोजन आहे. यासाठी म्हणून ०.२५ हेक्टर आर जागेमध्ये यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने मागील महिनाभरापासून काम सुरू आहे. जेसीबीच्या साह्याने खोदकाम केले जात आहे. या ठिकाणी तब्बल ७५०० विविध प्रजातीच्या झाडांची लागवड होणार आहे. यामध्ये औषधी वनस्पतींचा समावेश आहे.

 जैवविविधता, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचा हा उदात्त हेतू समोर ठेऊन हे काम केले जाणार आहे. मध्यचांदा वनविभागा अंतर्गत येणाऱ्या धाबा वनपरिक्षेत्रात असलेल्या गोंडपिपरी उपविभागात हे काम सुरु आहे. मात्र या जागेवर पूर्वी अस्तित्वात असलेल्या झाडांच्या मुळावर घाव घालून पर्यावरण संरक्षणाचे वनविभागाचे नियोजन आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या वनविभागाकडून सऱ्हासपणे झाडांची कत्तल होत असल्याने एकच आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

*रक्षक की भक्षक ?*

पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल बघता मीयावाकी रोपवन फुलविण्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहिल्यास लक्षात येते. यामुळे वनविभाग रक्षक की भक्षक.?, असा प्रश्न निर्माण होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये