भाजपा महिला मोर्चातर्फे गडचांदूर येथे “देवाभाऊ कृषी माऊली” सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट. प्रतिनिधी प्रमोद गिरटकर
गडचांदूर :- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षा मा. चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर (ग्रामीण) महिला मोर्चाच्या वतीने गडचांदूर येथील स्व. भाऊराव पाटील आश्रम शाळेत “देवाभाऊ कृषी माऊली” सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. देवराव दादा भोंगळे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी अधिकारी श्री. गोविंद ठाकूर, कार्यक्रमाच्या संयोजिका व भाजपा प्रदेश महामंत्री कु. अल्का आत्राम, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, कोमल फरकाळे, कोरपना तालुका अध्यक्षा सौ. स्मिताताई चिताळे, तालुकाध्यक्ष संजयभाऊ मुसळे, महामंत्री सतीश उपलेचवार, गडचांदूर शहराध्यक्ष अरविंद डोहे, शहर महामंत्री हरीश घोरे, सतीश बेतावार, महेश घरोटे, शहराध्यक्षा शितल धोटे, शहर महामंत्री उमाताई कंटाळे, नगरसेवक हिमांशू नामवाड, सुरज पांडे, नगरसेविका सौ. कीर्ती वैरागडे, सौ. संगीता गाऊत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे यांनी प्रास्ताविक करताना राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सर्व महिला मोर्चाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. तसेच पावसाळी अधिवेशनात महिलांना शेतकरी दर्जा देणारे विधेयक मंजूर झाल्याबद्दल सर्व महिला शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन केले. यावेळी महिला शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याचे (किट) वाटप करण्यात आले. कृषी अधिकारी श्री. गोविंद ठाकूर यांनी माती परीक्षणाचे महत्त्व, त्याचे फायदे व आधुनिक शेतीसाठी मृदा आरोग्य तपासणीची आवश्यकता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रदेश महामंत्री कु. अल्का आत्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, महिला बचत गटांशी जोडावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, शेतीपूरक उद्योग सुरू करून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात आमदार देवराव दादा भोंगळे यांनी राज्य शासनाच्या विविध कृषी, महिला व शेतकरी कल्याणकारी योजनांची माहिती देत महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. शितल धोटे यांनी केले, तर सौ. स्मिताताई चिताळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला शेतकरी, भाजपा महिला आघाडी च्या पदाधिकारी तथा युवा व सर्व पदाधिकारी उपस्थित होते



