ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरीत काँग्रेस कार्यालयावर भाजप युवा मोर्चाचा एल्गार!

भाजपा-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने : भाजपाच्या आक्रमक पवित्र्याने कॉंग्रेस कार्यालय दणाणले.

चांदा ब्लास्ट. प्रतिनिधी नंदू गुड्डेवार

ब्रह्मपुरी : पेपरफुटीच्या नावाखाली देशभरातील विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपा युवा मोर्चाच्या वतीने ब्रह्मपुरीत काँग्रेस कार्यालयावर जोरदार आणि आक्रमक आंदोलन करण्यात आले. भाजपा युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तनय देशकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलन काँग्रेस कार्यालयाकडे पोहोचताच भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसच्या विद्यार्थीविरोधी राजकारणाचा तीव्र निषेध केला. जोरदार घोषणाबाजी आणि आक्रमक आंदोलनामुळे काँग्रेस कार्यालय परिसर दणाणून गेला.

विद्यार्थी हिताच्या नावाखाली पोलिसांवर दगडफेक, महिलांसोबत अश्लील चाळे आणि देशाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक आंदोलन करणारे हे विद्यार्थी हिताचे आंदोलन असूच शकत नाही. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अशा हिंसक आणि देशविघातक कृत्यांची अपेक्षा नसते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर करून देशात अराजकता निर्माण करण्याचा हा काँग्रेसचा घातक प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्यांना आणि त्यांना राजकीय पाठबळ देणाऱ्यांना भाजपाने या मोर्चातून चांगले उत्तर दिले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्या काँग्रेसला भाजपा युवा मोर्चा जशास तसे उत्तर देईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या वेळी भाजपाचे युवा मोर्चा व महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये