ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विठ्ठल मंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्त भव्य वारीचे आयोजन

विठ्ठल रखुमाई मूर्तीची महापूजा व अभिषेक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          शहरातील किल्ला वॉर्ड येथील श्री विठ्ठल मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दि. २५ व २६ जुलै २०२६ रोजी भव्य आषाढी एकादशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह विठ्ठल-रखुमाई पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

दि. २५ जुलै रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वाजता विठ्ठल-रखुमाई मूर्तीची महापूजा व अभिषेक मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० ते ११ वाजता विठ्ठल-रखुमाई पालखीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

या शोभायात्रेचे उद्घाटक मा. प्रतिभाताई धानोरकर, खासदार, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र यांचे शुभ हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मा. करणजी देवतळे, आमदार, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र; मा. प्रफुल चटकी, नगराध्यक्ष,मा. मधुकर काळे, नायब-तहसीलदार मा. योगेश्वर पारधी ठाणेदार, मा. डॉ. विशाखा शेळके, मुख्याधिकारी, मा. डॉ. प्रकाश महाकाळकर, गटशिक्षणाधिकारी, मा. बळवंतदादा गुंडावार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, भद्रावती तसेच मा. सुषमाताई शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या, भद्रावती यांची उपस्थिती राहणार आहे.

रात्री ८.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सौ. भावनाताई तन्नीवार व संच, चंद्रपूर यांचे कीर्तन होणार आहे.

दि. २६ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजता कीर्तन व गोपालकाला ह.भ.प. सौ. भावनाताई तन्नीवार व संच यांच्या उपस्थितीत होणार असून, दुपारी २.३० ते ४ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य वारी व आषाढी एकादशी महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर देवस्थान समिती, किल्ला वॉर्ड, भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये