ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू पिवुन दारूच्या नशेत वाहन चालविणा-या 1 अॅक्टीव्हा मोपेड वाहन, 1 हिरोहोंडा वाहन चालक, 2 वाहन जप्त यांचेवर कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे या करीता पोलीस अधिक्षक श्री.सौरभ कुमार अग्रवाल साहेब व अपर पोलीस श्री.अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब वर्धा जिल्हा यांचे मार्ग दर्शनाखाली जिल्हातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वरीष्ठांनी ब्रिथ अॅनीलाइझर सह संपूर्ण वर्धा जिल्हयात दि. 17/07/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि. 17/07/2026 रोजी वर्धा पेट्रोलींग दरम्याण सफौ अनिल तिवारी ब.क 443, पोड्या मुकेश राऊत ब.क 1265, पोहवा उमेश पांडे ब.क 245, पोहया चंद्रकांत तपासे ब.क 1492 पोशि प्रदीप कोहळे ब. क 983 यांनी ईतवार वर्धा येथे चेक केले असता नमुद 1) वाहन चालक कमांक MH 32 BA 4530 अॅक्टीव्हा मोपेड चा चालक नागे सुनिल अरूनराव दुरतकर वय 37 वर्ष रा. केळकर वाडी गोंड प्लॉट वर्धा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळून आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्षा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 1242 mg टक्के अल्कोहोल प्रमाण निळुन आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर बाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

तसेच 2) वाहन चालक क्रमांक MH 32 AP 4946 हिरोहांडा चा चालक नामे किशोर नागोराव पराते वय 48 वर्ष रा. इंझापुर वार्ड क : बोरगाव मेघे वर्धा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्षा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 117.9 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळुन आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

वरून सन 2026 मध्ये पुर्ण वर्धा जिल्हयाच्या ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह च्या एकूण 258 केसेस, एकुण लायसन्स निलंबन प्रस्ताव 58 पाठविण्यात आले, एकुण 129/177 हेल्मेटच्या 3485 केसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकच्या 66 (1)/192 (अ) एकुण 113 केसेसे करण्यात आल्या आहे. वर्षा श पेट्रोलींग दरम्याण दारू पिवुन वाहन चालवु नये, हायवेवर टुव्हीलर चालवितांना हेल्मेट वापरावे, फोरव्हीलर चालवितांना सिटब्लेट लावावा जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल अशा वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.

तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक, व्ही. पाटील.वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरीकांना करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये