डॉ. पाटील दातांचा दवाखान्याच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
डॉ. पाटील दातांचा दवाखान्याच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत माहेर शांतिनिवास, सेलू येथे निराधार, बेवारस व मनोरुग्ण बांधवांसाठी भोजनदानाचा समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून उपस्थितांना आनंददायी वातावरणाचा अनुभव देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर संस्थेतील आश्रितांसोबत वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी डॉ. पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. पाटील यांचे कुटुंब माहेर शांतिनिवासातील गरजू व निराधार बांधवांना वेळोवेळी मदतीचा हात देत असून, याही वर्षी वर्धापन दिनानिमित्त भोजनदान करून समाजापुढे सेवाभावाचा आदर्श ठेवला.
या कार्यक्रमाला माहेर शांतिनिवासचे कार्याध्यक्ष श्री. अतुल शेळके, डॉ. रजत पाटील, डॉ. प्रीती पाटील, डॉ. प्रविण कापसे, श्री. सिद्धार्थ पाटील, सौ. रेखा पाटील-मॅडम तसेच श्री. पवन आहाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थितांनी डॉ. पाटील दातांचा दवाखान्याच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून राबविण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावला.



