ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

_तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या मोजा चेकदुबारपेठ येथे “कडधान्य आत्मनिर्भरता अभियान” अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण आज दिनांक ८ जुलै रोजी शेताच्या बांधावर आयोजित करण्यात आले. बंदिस्त वर्गखोलीत मार्गदर्शन न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर प्रशिक्षण घेण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना तूर पिकाच्या एस. ओ.पी. बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये तूर पिकाची टोकन पद्धतीने लागवड, ७५ टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता असलेल्या बियाणांची लागवड, बीज प्रक्रिया याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

आंतरपीक लागवड केलेल्या तूर पिकाचे प्रशिक्षणार्थी यांनी निरीक्षण केले असता ते रोग व किड मुक्त असल्याचे दिसून आले. तसेच तूर पिक चार पानाचे झाल्याचे आढळले.

कृषी विभागाची PMFME योजना, MAHADBT, अवजार बँक, PM KISAN e_kyc , e_pik पाहणी, माती नमुना तपासणी, सेंद्रिय आणि जैविक निविष्ठांचा वापर इतर विविध योजना याची माहिती आणि मार्गदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी आर. डी. निकोडे यांनी केले.

गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी एम. जी. पानसरे, धाबा मंडळ कृषी अधिकारी के.एम.टोंगलवार यांच्या मार्गदर्शनात शेतकरी प्रशिक्षण उत्साहात पार पडले. सदर प्रशिक्षणाचे सूत्र संचालन गोवर्धन आत्राम यांनी तर आभारप्रदर्शन सत्यपाल उइके यांनी केले. याप्रसंगी गावातील महिला व पुरुष शेतकरी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये