ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव महीत युवकाची गळफास घेवून आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील 24 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सचिन रंगनाथ शिंगणे (वय 24, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा) असे मृतक युवकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन रंगनाथ शिंगणे या युवकाने गळफास घेतला. त्यानंतर त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव मही येथे आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केल्यानंतर मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायमी मर्ग क्रमांक 27/2026 नोंदविण्यात आला आहे. हा मर्ग भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 194 अन्वये दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी डॉ. मयुरी विलास मुरुडकर यांच्या तर्फे ग्रामीण रुग्णालयातील कक्षसेवक संदीप मधुकर झिने (वय 32) यांनी संबंधित एमएलसी अहवाल पोलिसांकडे सादर केला. त्यानुसार पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास हाती घेतला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. मृत्यूचे कारण, त्यामागील परिस्थिती तसेच इतर बाबींची पडताळणी तपासादरम्यान केली जाणार आहे.

या घटनेमुळे देऊळगाव मही परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये