ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अऱ्हेरनवरगांव ते ब्रह्मपुरी रस्त्याला खड्डेच खड्डे. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

 ब्रह्मपुरी :- तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अ-हेरनवरगांव ते ब्रह्मपुरी जाणाऱ्या मुख्य रस्त्याला जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असल्यामुळे, शेतात चिखल मारणाऱ्या ट्रॅक्टरचे चिखलाचे रस्त्यावर साम्राज्य पसरल्यामुळे दोन, चार चाकी, अवजड, शालेय प्रवासी वाहनधारकांना व साईकील ने शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनीं कर्मचारी यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

प्रसंगी एखाद्या दिवशी वाहन पलटी मारून मोठा अपघात होण्याचा जीवितहानी होण्याचा धोका संभवतो. अ-हेरनवरगांव ते ब्रह्मपुरी हा मुख्य रस्ता ब्रह्मपुरी व चिमूर या दोन विधानसभे मध्ये वाटणी झालेला आहे. त्यामुळे या रस्त्याकडे दोन्ही विधानसभा क्षेत्राचे आमदार महोदय व शासकीय अधिकारी यांनी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन या रस्त्याचे नूतनीकरण करून सिमेंट काँक्रीट चा रस्ता तयार करून द्यावा अशी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या भालेश्वर, अ-हेरनवरगांव,पिंपळगांव भोसले वाशीय जनतेची मागणी आहे.

मागील काही महिन्यात तयार करण्यात आलेल्या अंदाजे दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण तयार करण्यात आले. संबंधित ठेकेदाराने तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे पूर्ण बांधकाम झाल्याचे,मंजुरीचे अंदाजपत्रकीय सूचनाफलक अजून पर्यंत रोडवर लावलेले नाही. त्यामुळे सदर रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट डांबरीकरणाने रस्ता ठीक ठिकाणी फुटलेला असल्यामुळे जनतेला शंका तयार झाली आहे की या बांधकामात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये