धारधार लोखंडी तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या युवकाला पोलिस स्टेशन वर्धा शहर डि बी पथकाचे घेतले ताब्यात
पोलिस स्टेशन वर्धा शहर डि बी पथकाने केलेली कार्यवाही..
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 30 जून 2026 रोजी 12.30 ते 1 दरम्यान पोलीस स्टेशन वर्धा शहर डि बी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड व पोलिस कर्मचारी पेट्रोलींग करीत असताना मुखबिरकडून माहिती मिळाली की पुलफैल चौकात वर्धा येथील सार्वजनिक ठिकाणी एक इसम हा त्याचा हातात एक धारधार लोखंडी तलवार बाळगून दहशत पसरवीत आहे व जोरजोरात ओरडत आहे अशी माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी व पंच पुलफैल चौकात वर्धा येथे आले असताना एक इसम सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालत आहे असे दिसून आल्याने त्याला पंचाला दाखवून पोलिस कर्मचारीच्या मदतीने घेराव टाकून त्यास शिताफीतीने ताब्यात घेण्यात आले आणि त्याला निशस्त्र करून त्याला त्याचे नाव आणि पत्ता विचारले असता त्याचे नाव प्रज्वल उर्फ पज्या सुभाष चचाणे वय 27 वर्ष राहणार पुलफैल वर्धा असे सांगितल्यावरुण त्याची पंचासमक्ष अंगझडती घेऊन त्याच्या हातातून एक लोखंडी धारधार तलवार जप्त करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे आणून सरकार तर्फे फिर्यादी नामें पोलिस शिपाई रंजीत अशोकराव भुरसे वय 36 वर्ष बक्कल नंबर 1717 पोलिस स्टेशन वर्धा शहर यांच्या तोंडी रिपोर्ट देऊन आरोपींवर पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्रमांक 923/2026 कलम 4 ,25 भा.ह.का. दाखल करण्यात आले
हि कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल वर्धा अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशीव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील महाडीक वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन वर्धा शहरचे पोलीस निरीक्षक श्री नागेशकुमार चतरकर यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार महेद्र पाटील, अभिजीत वाघमारे, रंजीत भुरसे, अमोल साळवन यांनी केली.


