सचिवासह सरपंचावर कार्यवाही करा _ ग्रामस्थ
व्यथा ग्रामपंचायत निसलनी पेठगावची _ विविध योजनेतून लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ सचिव, सरपंचाच्या संगनमताने गावाच्या विकासात्मक विविध योजने मार्फ़त आलेल्या निधिचा गैरवापर होऊन मोठा भ्र्ष्टाचार झाला असून सरपंच सचिवावर कार्यवाही करन्यात यावी अशी मागणी गावकऱ्यामार्फत केली जात आहे तालुक्यातील निलसनी पेडगाव ग्रामपंचायत येथे १५ वा वित्त आयोगांतर्गत निधीतून शासकीय कार्यालयात वस्तू खरेदी मध्ये मोठा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले.
सन २०२४, २५ते २६ या कालावधीत ग्रामपंचायतला सोलर हायमॅक्स किंमत २०५६२७, सोलर लाईट किं. ३६६४३वाटर कुलर १लाख, पोषण आहार किंमत ४२७३७, बेंच किं. ११७१७० कीटक नाशक फवारणी १३५३५ फवारणी पंप कि. १०००० बोलकी अंगणवाडी करणे २८५०० अंगणवाडी खेळणी २००००, कुंपण जाळी ११७१६४, कोंडवाडा जाळी १११३०६, नळ फिटिंग २लक्ष, नळ योजना २९०३०७ अशी एकूण रक्कम १२९२३७९ विविध वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, मात्र वस्तू खरेदी न करता काही पैशाची थेट सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी उचल केल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले .ग्रामस्थांनी तक्रार वरिष्ठांकडे केली चौकशी अहवालानुसार कॅश बुक ,पासबुक, वाउचर, नमुना क्रमांक १५ई टेंडर कोटेशन, gem, संबंधीचे खरेदी बाबतचे कागदपत्रे व इतर आवश्यक अभिलेख ग्रामपंचायत कार्यालय यात उपलब्ध नसल्याचे स्पष्ट चौकशी नंतर निदर्शनास आले, तसेच ग्रामपंचायत रेकॉर्ड मध्ये नमूद करण्यात आले, वस्तू व कागदपत्र शासन नियमानुसार ही सर्व कागदपत्रे कार्यालयात सुरक्षित ठेवणे बंधनकारक असताना ती उपलब्ध नसणे हे गंभीर प्रश्न आहे, चौकशी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणी नुसार खर्च नियमबाह्य असल्याचे नमूद करण्यात आले.
खरेदी केलेले साहित्य ग्रामपंचायत उपलब्ध नसल्याने व प्रशासक कार्यकाळात वस्तू खरेदी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्रशासकाला वस्तू खरेदी करण्याचा कोणताही अधिकार दिल्या नसल्यामुळे नियमाचा उलघंन झाल्याची दिसते,शासकीय निधीचे अपरातपर झाल्याने गावात ग्रामपंचायत वर स्पष्ट रोष व्यक्त केले जात आहे.
सरपंच आणि सचिव यांनी केलेल्या घोटाळ्याची चौकशी पंचायत समिती स्तरावरून करण्यात आली व त्यात दोघांनाही दोषी ठरवण्यात आले संबंधित चौकशी अधिकाऱ्याने ग्रामपंचायत अधिकारी रोशन चहांदे यांच्याकडून तसेच विद्यमान प्रशासक सरपंच शुभांगी बारसगडे यांच्याकडून समप्रमाणात खर्च करण्यात आलेली रक्कम वसुली करण्याची तसेच त्या विरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची स्पष्ट शिफारस वरिष्ठ कडून केलेली आहे, विशेष बाब म्हणजे चौकशीसाठी वारंवार ग्रामसेवक यांना कळविण्यात आले.
मात्र ग्रामसेवकांनी स्पष्टीकरण नोंदविले नाही त्यामुळे चौकशी प्रक्रिये सहकार्य करणे, अभिलेख उपलब्ध करून देणे व शासकीय निधीच्या वापरावर संशय निर्माण होणे या बाबी अत्यंत गंभीर आहेत, गटविकास अधिकारी पंच समिती सावली यांचेकडून चौकशी अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे गेले, असून वरील रकमेतील खर्च झालेल्या निधीतून काही साहित्य चार दिवसा पूर्वी खरेदी करून ग्रामपंचायत पेडगाव येथे आणण्यात आले.
मात्र उर्वरित वस्तू खरेदी झाल्यानंतर ही वस्तू दिसत नसल्याने ग्रामस्थांना प्रश्न पडलेला आहे. संबंधित वस्तूची खरेदी न करता लाखोंचा अपरातफर केलेल्या ग्राम पंचायत अधिकारी व सरपंच यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे व तत्कालीन सरपंच तसेच ग्रामसेवकांनी खर्च केलेले रक्कम ग्रामपंचायतला जमा करण्यात यावे अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्था कडून सांगण्यात येत आहे
यावेळी नितीन टेम्पलवार, पांडुरंग पिपरे, काशिनाथ तिवाडे,नारायण शेरकी सुरज किनेकर ,धनराज लोणारे , शेखर किनेकर,सह गावातील अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.



