ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“गांजा अंमली पदार्थाची विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 29 जुन 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे ॲटी नार्काेटिक्स पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन समुद्रपुर हद्दीतील मौजा जाम चौरस्ता येथे सापळा रचुन एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, आरोपी नंदकिशोर दिनकर म्याने, वय 47 वर्ष, रा. राम मंदिर वार्ड हिंगणघाट हा मोक्कावर रंगेहाथ गांजा अंमली पदार्थांची विक्री करीता पायदळ वाहतुक करतांना मिळुन आला असुन, सदर गांजाचा माल हा त्याने इस्ताक अहमद अब्दुल मुनाफ रा. नोहिद नगर नागपुर व सरफराज मोहम्मद रा. पारडी दर्गा जवळ नागपुर यांचेकडुन खरेदी केल्याचे सांगितल्याने, नमुद आरोपी हे संगणमताने गांजा मालाची तस्करी करून विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीचे ताब्यातुन 02 किलो 227 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, नगदी रक्कम व मोबाईलसह जु.किं. 61,025 रू चा मुद्देमाल जप्त करून एकूण 03 आरोपींविरुद्ध पो.स्टे. समुद्रपुर येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

गांजा मालाचा पुरवठा करणारा पसार आरोपी नामे इस्ताक अहमद अब्दुल मुनाफ शेख वय 47 वर्ष राहणार नोहित नगर नागपूर यास पारडी पोलीस स्टेशन नागपूर च्या हद्दीतून अटक करण्यात आली.

सदरची हि कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे वर्धा, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स.पो.नि. श्री. आशिषसिंग ठाकुर, पो.उपनि. सिनूकुमार बानोत, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले, अक्षय राऊत, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये