ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

भद्रावती शहरालगतची घटना : वन परिक्षेत्राची वाघावर नजर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भद्रावती शहर लगत वाघाचा धुमाकुळ सुरूच असुन वाघाने एका गाईवर हल्ला करून गाईला ठार केले आहे. ही घटना आज पहाटे दिलीप तुलशीराम नागपुरे यांच्या शेतात घडली.

             या वाघावार नजर ठेवन्यासाठी जागो जागी सीसीटीवी कॅमेरे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी लावले असुन वाघावर कॅमेऱ्याच्या माध्यमाने नजर वनविभाग नजर ठेवीत आहे.

          ही गाय शंकर मारोती भोंडे यांच्या मालाकीची असुन त्यांचे एक लाख विस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची तक्रार भद्रावती वन परिक्षेत्र कार्यालयात केली असुन या घटनेचा पंचनामा करन्यात आला आहे. पुढील तपास क्षेत्र सहाय्यक विलास शिंदे हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये