Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

भिषण अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार – दोन ट्रकच्या ओवरटेकींगच्या नादात युवकाचा बळी

गंभीर जखमी युवकाला चंद्रपूरला हलविले - वर्धा नदीच्या पुलाजवळील घटना

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

बल्लारपूर राजुरा निर्माणाधिन राष्ट्रीय महामार्गामुळे आधीच लहान असलेल्या रस्त्याची रुंदी अधिकच कमी झाल्याने तसेच पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेले मातीच्या ढिगाऱ्यातील चिकट माती रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना अडचण होत असुन बेधुंद ट्रक चालक भरधाव वेगाने वाहन चालवून इतर लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र आज राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धा नदीच्या पुलाजवळ उघडकीस आली असुन आयशर वाहनाला पुरेशी जागा नसतानाही कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका युवकाचा बळी गेला.

सविस्तर वृत्त असे की सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास राजुरा येथिल कृष्णा कॅटेरर्स मधे काम करणारे बामणी येथिल गोयल रामकिसन मडावी वय 18 वर्ष, मारोती अरुण गेडाम वय 22 वर्ष व तिसरा एक युवक MH 34 U 2955 ह्या दुचाकीने बामणी येथून राजुरा येथे येत होते. दरम्यान वर्धा नदीच्या पुलाजवळ चंद्रपूर कडे जाणाऱ्या एका आयशर वाहनाला कंटेनर ने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला ह्यावेळी दुचाकीस्वाराने आपले वाहन बाजूला घेतली मात्र निर्मनाधिन राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढविण्यासाठी टाकलेली ओली माती असल्याने दुचाकी रस्त्यावर पडली.

ह्या अपघातामुळे गोयल रामकिसन मडावी हा युवक जागीच गतप्राण झाला तर अरुण गेडाम ह्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असुन तिसरा युवक मात्र सुखरूप बचावला आहे. मृतक युवकाच्या पश्चात आई, वडील, लहान बहीण व आजी असा परिवार आहे. अपघाताची माहिती कळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाचे शव राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले असुन पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये