Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. अंकुश गोतावळे यांना समाजभुषण पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

 जिवती :- डॉ अंकुश गोतावळे यांनी मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय राहून लेखन, प्रबोधन, समन्वय, आंदोलन अशा विविध आघाड्यावर काम करून समाजिक विषयांना न्यायाप्रत घेऊन जाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आर्टी ची निर्मिती, आरक्षण उपवर्गीकरण चळवळ, सुप्रीम कोर्टातील लढा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे मुंबई येथील स्मारक, क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे मुंबई येथील स्मारक यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर पुरस्कार वितरण सोहळा श्री. राम गणेश गडकरी रंगायतण ठाणे येथे डॉ अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिनभाऊ साठे,कुसुमताई गोपले,खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे तसेच पाटोळे,उपायुक्त ठाणे महानगरपालिका आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे.महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती सारख्या ठिकाणी राहून संपूर्ण महाराष्ट्रात काम करणाऱ्या डॉ.गोतावळे सारख्या एका सामान्य माणसाची दखल घेऊन मुंबई येथे सन्मानित केल्याबद्दल चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून आनंद व्यक्त करून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

ठाणे महानगर पालिका संयुक्त साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे उत्सव समिती थानेच्या वतीने दर वर्षी जयंती निमित्त महाराष्ट्रातील चळवळीत सक्रिय योगदान देणारे कार्यकर्ते, नेते, साहित्यिक, विचारवंत यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये