खेळता खेळता गळफास लागून चिमुकलीचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ खेळता खेळता एका निष्पाप चिमुकलीचा चुकून गळफास लागून एका १३ वर्षाची मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना केरोडा गावात सायंकाळ ४.३० ते ५ च्या दरम्यान घडली.
सावली तालुक्यातील केरोडा येथे राहणारे रामदास शिंदे यांची मोठी मुलगी नंदणी शिंदे असे चिमुकलीचे नाव आहे. शिंदे यांचे घर कवेलु मातीचे आहे. तिच्या अशा प्रकारे मृत्यू ओढवल्याणे पालकांनी टाहो फोडला आहे.
नंदणी ही आपल्या तीन बहिणी सोबत राहते घरी खेळ खेळत होते. खेळामध्ये ओढणीचा वापर करून खेळत होते. सदर ओढणी ही घराच्या फाट्याला बांधून पलंगावर चढून खेळ खेळत होते. तर अचानक अनावधानाने ती ओढणी नंदणी च्या गळ्यात गुंडाळल्याने ती पलंगाच्या खाली पडली यात त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ती तडफडत असतांना सोबत असलेले लहान तीन बहिणी हे धावत शेजारच्या नातेवाईकांना बोलविले असता तो पर्यंत खूप उशीर झाल्याने नंदणी ची प्राणज्योत मालवली. यावेळी नंदणी चे आई वडील हे काही कामा निमित्य व्याहाड खुर्द येथे गेले होत.
या घटनेची माहिती शेजारच्या नातेवाईकांनी नंदणी च्या आई वडिलांना सांगितले तसेच सावली पोलिस स्टेशन यांना फोन द्वारे माहिती देण्यात आली. सदर पोलिस घटनास्थळा भेट देवून घटनेचा पंचनामा करून सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय सावली येथे शवविच्छेदन करिता नेण्यात आले. या घटनेने शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली असून सावली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सावली पोलिस स्टेशन हे करीत आहेत.



