ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीस तीन वर्षांची शिक्षा व दोन हजार रुपये दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे 2022 मध्ये अपराध क्र. 25/2022 कलम 452, 354, 354(ड), भा.दं.वि. सहकलम 8, 10 बालकाचे लैंगिक अपराधा पासुन संरक्षण अधिनियम 2012 मधील फिर्यादी पिडीत अल्पवयीन मुलगी हि दिनांक 14/01/2022 रोजी स्वतःचे घरी हॉलमध्ये असतांना गुन्हयातील आरोपी नामे अमित किशारे ठाकरे हा तीचे घरी पिण्याचे पाणी मागण्याच्या हेतुने घरात जावुन पिडीतास चाकु दाखवुन तीचा विनयभंग केला होता. त्यासंदर्भात पिडीतच्या रिपोर्ट वरून वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील आरोपी नामे अमित उर्फ विवेक किशोर ठाकरे वय 39 वर्षे रा. साटोडा ता. जि. वर्धा याची मा. जिल्हा सत्र व न्यायाधीश वर्धा यांच्या कोर्टात केस सुरू असतांना ठाणेदार श्री. विनोद गिरी व कोर्ट पैरवी मपोहवा अश्वीनी वानखेडे यांनी गुन्हयातील साक्षीदारांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केल्याने मा. कोर्टाने आरोपीला 3 वर्ष कारावास व 2000 रू. आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल वर्धा, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, वर्धा, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर, वर्धा व पोलीस स्टेशन, सावंगी मेघे चे ठाणेदार श्री. विनोद गिरी, यांचे मार्गदर्शनात मपोहवा अश्वीनी वानखेडे, पोहवा चंद्रशेखर राउत व राजेश सहारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

(विनोद गिरी) ठाणेदार / पोलीस निरीक्षक पो.स्टे. सावंगी मेघे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये