ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा येथे योग दिवस साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.

विद्यालयाच्या प्रमुख सुनंदा दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग शिक्षक गोविंदराव अहिरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा येथील अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, व देवकला दिदी होत्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगा चे महत्त्व सांगून प्रत्येक व्यक्ती ने दररोज नियमित योगासने केली तर शरीर निरोगी व सुदृढ राहते असे म्हटले, योग शिक्षक गोविंदराव अहिरे यांनी विविध प्रकारचे योगासने करून घेतले.

यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये