ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थान देऊळगाव राजा येथे योग दिवस साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थान देऊळगावराजा येथे आर्ट ऑफ लिविंग परिवार, डॉक्टर असोसिएशन, राजस्थानी महिला मंडळ, पतंजली परिवार, जायंट्स ग्रुप यांच्या वतीने योगदिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प.पू.श्री.मोहननाथमहाराज पैठणकर, आमदार मनोजभाऊ कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अकोला येथील श्रीमती डॉ. अंशू गिनोडे मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व संबोधित केले.
या कार्यक्रमास देऊळगाव राजा येथील विविध संघटना संस्था यांचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य तसेच भाविक सज्जन यांच्यासह
महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय*
श्रीसंत तुकाराममहाराज वारकरी विद्यालय येथील विद्यार्थी उपस्थित होते.



