ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंभोरा येथे 33 के व्ही उपकेंद्राचे लोकार्पण आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

उंबरखेड रोड, अंभोरा येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, मेहकर विभाग यांच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. अंभोरा उपकेंद्र, देऊळगाव राजा उपविभाग याचे लोकार्पण आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उपकेंद्रामुळे अंभोरा व परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना अधिक सक्षम, दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच वीज वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढून परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.

यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये