वंदना बरडे अधीसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
दिनांक 30 जुलै रोजी धनगर अधिकारी व कर्मचारी नागपूर मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विषेश पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचा सत्कार करून गौरविण्यात आले सोबत सर्वंच गुणवत्त विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्ये, मंडळावर निवड झालेले, विषेश कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात वंदना विनोद बरडे अधीसेविका व सामाजिक कार्यकर्त्या तसेच अनेक मंडळाच्या पदांवर काम करणाऱ्या वंदना विनोद बरडे यांनी सामाजिकतेचै भान ठेवून आरोग्य विषयक जनजागृती करणार्यांसाठी पोस्टर प्रदर्शन बॅनर्स लावले व मूलामुलींचे आईवडील, नातेवाईक तसेच कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे मंडळी यांना त्याची माहिती दिली.



