ताज्या घडामोडी
विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्षनेते

चांदा ब्लास्ट :
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. विजय वडेट्टीवार यांची नवे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षनेते म्हणून बाळासाहेब थोरात यांनी निवड करण्यात आलेली आहे. अखेर काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तं केले आहे. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे.