कृषी योजना विषयी माहितीसाठी कृषीदुतांची बँकेला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगांवराजा:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी विभागासाठी असलेल्या योजनांबाबत माहिती गोळा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया देऊळगाव राजा येथील शाखेला भेट दिली. यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी कृषी विषयक उपलब्ध असलेल्या सर्व कर्ज योजनाबाबत माहिती दिली.
ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत माहिती नव्हती. अशा शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे मोलाचे काम कृषीदुतानी केले. पीक कर्ज हा एक प्रकारचा अल्पमुदतीचा कर्ज प्रकार आहे. जो पूर्व प्राथमिक संस्थाद्वारे लागवडीचा खर्च भरुन काढण्यासाठी दिला जातो. याचा उपयोग दर्जेदार बियाणे, खते खरेदी आदींसाठी केला जातो..या प्रकारे पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देवून शेतकऱ्यांच्या माहिती व समस्याच्या शंकाचे निराकरण केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मेहेत्रे व उपप्राचार्य देवानंद नागरे,रावे समन्वयक प्रा. मोहजितसिंह राजपूत , कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. देवानंद नागरे व प्रा.डॉ.उषा जायभाये यांचे मार्गदर्शन लाभले.उपक्रमात समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी गोविंद टाले, अक्षय उगले, सौरभ वाघ, करण वाघमारे, ओम वाकडे, विवेक वानखेडे, दिपक झगरे, सिद्धेश्वर मिसाळ, देवाशीष सरकटे,नयन चौधरी,यांनी सहभाग घेतला.



