ताज्या घडामोडी

वर्धा जिल्हातील ०३ सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

वर्धा जिल्हातील ०३ सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

प्रतिनिधी वर्धा..

वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समूळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक, श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी वर्धा जिल्हयातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवईचे, असामाजिक तत्वांना सोबत घेवुन गैर कायदयाची मंडळी गोळा करुन लोकसेवकास शासकीय कामात अडथळा निर्माण करुन खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्राने गंभीर दुखापत करणे, महाराष्ट्र जुगार कायदा, भारतीय हत्यार कायदा, अन्वये गुन्हे करणारे व्यक्ती विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुरसार पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) ठाणेदार यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरुन मा. पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांचे आदेशान्वये खालील नमुद सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्हातुन २ वर्षाकरीता वर्धा जिल्हयातुन हद्दपार केले आहे.

१) राजकुमार वेतनसिंग वावरी वय ३५ वर्ष २) मुक्कदरसिंग वेतनसिंग बावरी वय ४६ वर्ष ३) जेलसिंग उर्फ

जयंतसिंग वेतनसिंग बावरी वय ४० वर्ष सर्व रा. शिखबेडा सावंगी मेघे ता. जि. वर्धा

सदर आदेश तामीली करीता पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर हद्दपार गुन्हेगारांचे शोध संबंधाने युध्द स्तरावर मोहीम राबवून त्यांचा शोध घेवुन अंमलबजावणी करण्यात आली असुन त्यांना वर्धा जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, श्री. सदाशिव बाघमारे यांचे मार्गदर्शनात श्री सुनिल महाडीक उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, पो.नि. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि. श्री विनोद गिरी, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी (मेघे), पोहवा संजय बोगा/२९५, उ.वि.पो.अ. कार्यालय, वर्धा, म.पो.हवा. पल्लवी बोबडे/१३२४ स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.हवा. सचिन घेवंदे ब. नं. ८४२, पोलोस स्टेशन सावंगी मेघ, म.पो.ना. शुभांगी महाजन ब. नं. १५१६ पो.स्टे. सावंगी मेघे, पो. अंम. दिनेश करलुके १५७८, स्था.गु.शा. वर्धा, यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये