ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवेदनाची दखल ; पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयातील बंद पथदिवे अखेर सुरू!

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तत्काळ लक्षानंतर नवीन वायरिंग ; रुग्ण व नागरिकांना दिलासा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या पथदिव्यांच्या समस्येची अखेर दखल घेण्यात आली असून, सामाजिक कार्यकर्ता रुपेश मंकीवार, पोंभुर्णा यांनी माननीय श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडलेल्या समस्येचे तातडीने निराकरण करण्यात आले आहे.

ग्रामीण रुग्णालय परिसरातील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करत रुपेश मंकीवार यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या सह्यांसह निवेदन देण्यात आले होते.

या निवेदनाची दखल घेत सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांनी तातडीने लक्ष घालून श्री. बंडूभाऊ बुरांडे, माजी सरपंच, जाम खुर्द यांना ग्रामीण रुग्णालयातील बंद पथदिव्यांची समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले.

त्यानुसार दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी श्री. बंडूभाऊ बुरांडे यांनी दोन लाईनमनना सोबत घेऊन दिवसभर ग्रामीण रुग्णालय परिसरातील विद्युत फॉल्ट व संपूर्ण वायरिंगची पाहणी केली. खराब झालेली वायरिंग बदलून नवीन वायरिंग टाकण्यात आली आणि ग्रामीण रुग्णालय परिसरातील बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरू करण्यात आले.

पथदिवे सुरू झाल्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सामान्य नागरिकांची अडचण लक्षात घेऊन तातडीने समस्या मार्गी लावल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांचे मनापासून आभार

सामाजिक कार्यकर्ता रुपेश मंकीवार पोंभुर्णा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये